मला नेहमी मानवी मनाचं आश्चर्य वाटतं!
आता श्रद्धा हाच विषय घ्या............
लोक आपले किती आंधळेपणानी श्रद्धा ठेवतात. गर्दी मागून जायची 'मासेस' ची ही मनोवॄत्ती अनाकलनीय आहे.
गुरुमहाराज, त्यांचेप्रती असणारं प्रेम, कुठलीही प्रचीती आल्यशिवाय असणारा उदंड विश्वास..सारेच मला तरी नवलाचे वाटते.
बरं त्यात सर्वच लोक असतात, जुने जाणते, नवे नवखे, स्त्रिया, पुरुष, डॉक्टर्स, पत्रकार, गायक, विमा एजंट्स,बिल्डर्स ..प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो, आणि ते काहीतरी सोल्यूशन मागायला येतात.
कस हे .?
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Friday, November 24, 2006
Tuesday, November 07, 2006
मुन्नार
नुकताच मुन्नार ला भेट देण्याचा योग आला.....इतकं रमणीय आणि सुंदर ठिकाण आहे...!
मैलोनमैल पसरलेल्या, हिरव्यागार मखमालीने लपेटलेल्या तॄप्त टेकड्या, मधूनच डोकावणारा चुकार रस्ता, झरे, पाखरं.........सगळंच अगदी एखादा कॅनव्हास पहात असल्यासारखं...नीटस, रेखीव, देखणं........
चहाच्या मळ्यांमध्ये ते लोक जायला थोडी वाट ठेवतात...रोज-कॉलम्स मध्ये...नागमोडी........दुरून पहातांना प्रेस फ़िट च्या टाईल्स असतात नं...तसे आखीव पणे टी प्लॅंटेशन केल्यासारखे दिसते.....हिरव्या टाईल्स बसविल्यसारखे...
आणि त्याचा विस्तार तरी किती...नजर पोहोचेल तिथपर्यंत आपली लवलवती, मुलायम हिरवळ पसरलेली....
एका टिकाणाहून तर अगदी चित्रात काढतो तसे दृष्य होते....तळं, पक्षी, आकाश, डोंगर.........सारं काही जिथल्या तिथे...
धुकं आपलं अधिरपणे वर वर चढत येतं.....पुन्हा निवळतं..पुन्हा चढतं.....
तोच आशा अपेक्शांचा जीवघेणा खेळ............जुनाच..तरी प्रत्येक वेळी नवा वाटणारा.............
मुनार असं अंतर्मुख करतं........आपल्याजवळचं सारं काही भरभरून देउन टाकतं..... आणि दर वेळी पुन्हा निसर्गाचे सारे रंग उधळायला सज्ज होतं!

Wednesday, October 11, 2006
सहज
खरं तर मला खूप लिहावसं वाटतं ब्लॉग वर........पण घरा-मुलांच्या आणि ऑफ़िस च्या आणि इतर व्यापांमध्ये सगळं राहून जातं
रात्री पुस्तक वाचायला मिळतो तोच खरा 'माझा' असा खास वेळ..
उत्साह वाढविणारा, दिलासा दायी

Monday, September 25, 2006
हार्ट
काल 'वर्ल्ड हार्ट डे' होता. एका मैत्रीणीचा मेसेज आला की ' लेट अस टेक अ व्हाउ टू टेक केअर ऑफ़ अवर ऍन्ड अवर फ़ॅमिलीज हार्टस.'
..किती हॄद्य कल्पना आहे...हॄदयाची काळजी वहायची... आपल्याच नव्हे तर जिवलगांच्याही....
मुलांना सुद्धा हे आतापासूनच सांगा-समजावयाला हवं आहे! मॅक्डोनाल्डस पेक्षा घरचं जेवण किती चांगलं असतं ते! (सुदैवाने आमच्याकडे ते पटलेलं आहे!)
आणि चालत जाणं किती आनंददायी असू शकतं ते...आणि प्राणायाम किती सोप्या पद्ध्तीने करता येवू शकतो ते..आणि ध्यानाने किती शांत वाटतं ते...
किंवा ताण न घेता सारखं हसत राहणं किती महत्वाचं आहे ते!
तुम्हा सर्वांना ''वर्ल्ड हार्ट डे' च्या मनापासून शुभेच्छा!

Tuesday, August 22, 2006
कधीतरी
कुणीसं, मला वाटतं कवी चंद्रशेखर गोखले यांनी बहुधा म्हटलं आहे,
खूप दिवसांच्या संततधार पावसानंतर एकदम लख्ख सोनेरी ऊन पडावं तसं आपल्या आयुष्यात प्रेम येतं.
नको म्हणता थांबत नाही, मात्र ये ये म्हटल्याने येत नाही............
कशी ही भावना ...अलवार, नाजूक, अनोळखी...
खूप हवीहवीशी...
झोकून देतांना काहीही न उरवावेसे वाटणारी..........

Thursday, August 17, 2006
कोल्हाट्याचा पोर.........१७-ऑगस्ट-०६
सद्ध्या मी किशोर शांताबाई काळे चं 'कोल्हाट्याचा पोर' हे आत्मचरित्र वाचते आहे.
आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वातावरणात वाढून डॉक्टर झालेल्या किशोरची कहाणी चटका लावून जाते.
नाचणारी आई, तिचा हा दुर्लक्षित मुलगा, सामाजिक प्रथा आणि समजुती....
पैशाच्या मागे धावणारी, कळाहीन, क्षुद्र माणसं....सारंच मन विषण्ण करणारं!
नीती-अनीती च्या, लौकिकाच्या पांढरपेशी कल्पनांना धुडकावून पत्करलेलं उपेक्षित,दुःखी जीवन!
आपण फ़क्त उसासण्याखेरिज काय करू शकतो?

Wednesday, August 16, 2006
ashwinis-creations
पुण्यात आय.आय.टी.......
काल मी एन.सी.एल. कॅंम्पस मध्ये स्थित असलेल्या आय.आय.एस.ई.आर (आयसर) च्या उदघाटनाला गेले होते.
तिथले ते दीप्त, झळाळते विद्यार्थी, प्रोफ़ेसर्स आणि सायंटिस्ट्स पाहून मन भरून आलं...पुण्यात I.I.T. निघाल्याचा आनंदही होता.
फ़क्त हे सर्व आपल्या भारताच्या कामी यायला हवं...
भारताला प्रगतीची, समृद्धीची.....नैतिक समृद्धिची म्हणा हवं तर... क्षितीजं कवेत यायला हवीत...

Tuesday, August 08, 2006
ashwinis-creations
ashwinis-creations
खूप दिवसांपासून मला ही कविता आठवत होती, दुसरीत असतांना पाठ केलेली.....
"पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ"
कुणाला ही पूर्ण येत असेल तर प्लीज मला कळवा..........
या कवितेशी माझ्या लहानपणीच्या खूप आठवणि निगडित आहेत.
...
पावसाळी दिवसात त्या अधिक कातर होतात, मन मागे खेचल्या जातं...आजच्या सगळ्या सुखसोयी वृथा वाटू लागतात, आणि जुनेच ते अडी अडचणींचे, पड्त्या पावसातल्या मंद पिवळ्या बल्बचे, श्रावण सोमवारी केलेल्या केळ्याच्या शिकरणीचे, कुठलंही मोठं दडपण नसलेले ,अतिशय क्षुल्लक सुखांचे दिवस आठवून मन भरून येतं........
किंबहुना ज्या वेळी जे असतं ते न आवडणं हाही मानवी मनाला मिळालेला एक शापच म्हणायला हवा!

Tuesday, August 01, 2006
ashwinis-creations
ashwinis-creations
सद्ध्या मी मीना प्रभु यांचं 'चिनी माती' हे अप्रतिम पुस्तक वाचते आहे.
चीनचं, थोड्या अपरिचीत चीनचं अतिशय मनोहारी वर्णन आहे. लेखिका स्वतः उत्साही आणि नवे अनुभव घ्यायला उत्सुक असलेली पर्यटक आहे, त्यामुळे कुठे कंटाळवाणे होत नाही.
चीन च्या जेवणाच्या पदधती, त्यांचे विचार ,संस्कार, राहणीमान, रिवाज...सगळ सगळं त्यात उतरतं!
लेखिकेची खोल जिद्न्यासा, अंतरंगात शिरून जाणून घेण्याची वृत्ती आणि सर्व प्रकारच्या अनुभवांसाठी सदा सिद्ध असलेलं निखळ , ओपन मन.... या गोष्टी हे प्रवासवर्णन रंजक व्हावयास मदत करतात.
ह्या दोघी कधी थकत कश्या नाहीत, आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची गैरसोय अजिबातच कशी जाणवत नाही याचा विस्मय वाटल्यावाचून राहवत नाही.
पण चीनला कधी जाउ तेव्हा जाऊ...सद्ध्या तरी हे पुस्तक चीनच्या व्हर्चुअल सफ़रीचा मनमुराद आनंद देतं!

Tuesday, July 25, 2006
ashwinis-creations
ashwinis-creations
रोजच्या रोज घरा-कामात, व्यापात, काय लिहिणार वेगळं?
पण तरीही असं वाटतं की हे सगळं करीत असतानाही मी मनातून अशी त्यात कशात नसतेच मुळी.... मी असते कुठेतरी पुलंच्या पुस्तकात हरवलेली, किंवा गौरी देशपांडे च्या सकस लेखनात रमलेली....किंवा मग अशीच अधांतरी.............

काल संदीप खरे-सलिल कुलकर्णी चा अल्बम 'आयुष्या वर बोलू काही' ऐकला. सुंदर आहे...पण जरा कॉलेज च्या वयाचं अल्लड प्रेम वाटतं!
अर्थात त्यांच्या कार्यक्रमांना कॉलेजियन्स च बहुसंख्येने असतात!

Monday, July 24, 2006
Introduction...........
Hi.
A warm Welcome to my Blog!
All comments , opinions and suggestions are welcome!
I am Ashwini, from India.
I love to read, cook and listen to silent music.
Reading Marathi is my passion....
I like intelligent, logical and fun loving people, and I do not like to be in the company of twist minded, complex and tragic-irritable people...!

Subscribe to:
Posts (Atom)