सद्ध्या मी किशोर शांताबाई काळे चं 'कोल्हाट्याचा पोर' हे आत्मचरित्र वाचते आहे.
आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वातावरणात वाढून डॉक्टर झालेल्या किशोरची कहाणी चटका लावून जाते.
नाचणारी आई, तिचा हा दुर्लक्षित मुलगा, सामाजिक प्रथा आणि समजुती....
पैशाच्या मागे धावणारी, कळाहीन, क्षुद्र माणसं....सारंच मन विषण्ण करणारं!
नीती-अनीती च्या, लौकिकाच्या पांढरपेशी कल्पनांना धुडकावून पत्करलेलं उपेक्षित,दुःखी जीवन!
आपण फ़क्त उसासण्याखेरिज काय करू शकतो?
1 comment:
वाचुन बरीच वर्ष झाली, पण हे पुस्तक खुपच परिणामकारक आहे.
Post a Comment