Monday, September 25, 2006

हार्ट

काल 'वर्ल्ड हार्ट डे' होता. एका मैत्रीणीचा मेसेज आला की ' लेट अस टेक अ व्हाउ टू टेक केअर ऑफ़ अवर ऍन्ड अवर फ़ॅमिलीज हार्टस.'

..किती हॄद्य कल्पना आहे...हॄदयाची काळजी वहायची... आपल्याच नव्हे तर जिवलगांच्याही....
मुलांना सुद्धा हे आतापासूनच सांगा-समजावयाला हवं आहे! मॅक्डोनाल्डस पेक्षा घरचं जेवण किती चांगलं असतं ते! (सुदैवाने आमच्याकडे ते पटलेलं आहे!)
आणि चालत जाणं किती आनंददायी असू शकतं ते...आणि प्राणायाम किती सोप्या पद्ध्तीने करता येवू शकतो ते..आणि ध्यानाने किती शांत वाटतं ते...
किंवा ताण न घेता सारखं हसत राहणं किती महत्वाचं आहे ते!



तुम्हा सर्वांना ''वर्ल्ड हार्ट डे' च्या मनापासून शुभेच्छा!