Tuesday, January 27, 2009

प्रयत्न!

नुकतीच एक दिलासादाय़ी बातमी वाचनात आली. ती अशी की, अमेरिकेत स्थायीक झालेल्या भारतीयांनी मिळून एक “दबाव गट” , (टास्क फ़ोर्स ) स्थापन केला आहे, आणि त्यांचे सुमारे १५० जणांचे प्रतिनिधी मंडळ आज ओबामा यांना भेटून पाकिस्तान वर कारवाई करणे कसे गरजेचे आहे, त्याचा सगळ्यांना कसा फायदा होईल हे सांगणार आहे.
त्यायोगे अमेरिकेकडून पाकिस्तानवर अधिक दबाव येऊ शकेल.

आजच्या परिस्थितीत ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण पाकिस्तान वर डायरेक्ट हल्ला करु शकत नाही आणि राजनैतीक कौशल्यानेच ही परिस्थिती हाताळावयास हवी. अमेरिकेकडूनच पाकचा परस्पर काटा काढणे जरुरी आहे.

अमेरिकास्थित भारतीयांना आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची ही सुसंधी आहे. भारतमातेचे सुपुत्र बाहेर राहूनही तिच्या हितासाठी, रक्षणासाठी पाऊल उचलत आहेत हे वाचून मन आनंदित झाले.
त्यांना या इनिशिएटिव्ह साठी आणि पुढिल फॉलो अप साठी अनेक शुभेच्छा.

आपल्या ब्लॉग मित्रांपैकी कुणी आहे का या कृती समितीत?

याचा कितपत फायदा होईल ही पुढची गोष्ट आहे, कारण अमेरिकेला भारताच्या हितात फारसे स्वारस्य नाही, पण पहिले पाऊल महत्वाचे असते....त्यानेच तर पुढचा मार्ग चालायला सुरुवात होते.