Tuesday, January 27, 2009

प्रयत्न!

नुकतीच एक दिलासादाय़ी बातमी वाचनात आली. ती अशी की, अमेरिकेत स्थायीक झालेल्या भारतीयांनी मिळून एक “दबाव गट” , (टास्क फ़ोर्स ) स्थापन केला आहे, आणि त्यांचे सुमारे १५० जणांचे प्रतिनिधी मंडळ आज ओबामा यांना भेटून पाकिस्तान वर कारवाई करणे कसे गरजेचे आहे, त्याचा सगळ्यांना कसा फायदा होईल हे सांगणार आहे.
त्यायोगे अमेरिकेकडून पाकिस्तानवर अधिक दबाव येऊ शकेल.

आजच्या परिस्थितीत ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण पाकिस्तान वर डायरेक्ट हल्ला करु शकत नाही आणि राजनैतीक कौशल्यानेच ही परिस्थिती हाताळावयास हवी. अमेरिकेकडूनच पाकचा परस्पर काटा काढणे जरुरी आहे.

अमेरिकास्थित भारतीयांना आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची ही सुसंधी आहे. भारतमातेचे सुपुत्र बाहेर राहूनही तिच्या हितासाठी, रक्षणासाठी पाऊल उचलत आहेत हे वाचून मन आनंदित झाले.
त्यांना या इनिशिएटिव्ह साठी आणि पुढिल फॉलो अप साठी अनेक शुभेच्छा.

आपल्या ब्लॉग मित्रांपैकी कुणी आहे का या कृती समितीत?

याचा कितपत फायदा होईल ही पुढची गोष्ट आहे, कारण अमेरिकेला भारताच्या हितात फारसे स्वारस्य नाही, पण पहिले पाऊल महत्वाचे असते....त्यानेच तर पुढचा मार्ग चालायला सुरुवात होते.

7 comments:

HAREKRISHNAJI said...

good suggestion

HAREKRISHNAJI said...

where are you ?

HAREKRISHNAJI said...

same questions , where are you

भानस said...

मीही वाचलीये ही बातमी, अनेक शुभेच्छा आहेतच. आशावादी असणे आवश्यक आहेच.

HAREKRISHNAJI said...

कुठे गायब झाल्या आहात ?

साळसूद पाचोळा said...

अमेरिकेच्या मदतीने पाकला अदाविने तितकेसे सोपे नाही... भारतावर अंकुश ठेवण्यासाठी त्याना पाक हवा आहे.. तोही भारतावर लश्ह्कारी दबाव आनन्या इतपत सक्ष्हम... त्यामुले पाहुन्याच्या पायाने विंचू मारने इथे सोपे नाही हे ही ध्यानी घ्यावे...आणि आपल्यासाठी अमेरिका त्यांच्या "मनीचे गूढ़" विसरून पोलिशी चेंज करेल हे म्हणजे स्वप्न आहे..

Sandeep Godbole said...

!! देवा !
ते काय करीत बसलेत अमेरीकेत ?
त्यांनाच माहीत नाही !
ऒबमाला अद्न्य समजण्याची नादानी ?
की
जगातील स्रर्वात मोट्ट्ठ्या शेट्जी समोर देशाच्या नांवे भीक मागतोय याचा मनस्वी आनंद ?

बेगर्स आर नौट चुजर्स !

टास्क फोर्स च्याआड , सन्माननीय अपवाद सोडता,आपले ऊखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न होण्याचे चांसेस नाकरता येणार नाहीत.