Monday, September 25, 2006

हार्ट

काल 'वर्ल्ड हार्ट डे' होता. एका मैत्रीणीचा मेसेज आला की ' लेट अस टेक अ व्हाउ टू टेक केअर ऑफ़ अवर ऍन्ड अवर फ़ॅमिलीज हार्टस.'

..किती हॄद्य कल्पना आहे...हॄदयाची काळजी वहायची... आपल्याच नव्हे तर जिवलगांच्याही....
मुलांना सुद्धा हे आतापासूनच सांगा-समजावयाला हवं आहे! मॅक्डोनाल्डस पेक्षा घरचं जेवण किती चांगलं असतं ते! (सुदैवाने आमच्याकडे ते पटलेलं आहे!)
आणि चालत जाणं किती आनंददायी असू शकतं ते...आणि प्राणायाम किती सोप्या पद्ध्तीने करता येवू शकतो ते..आणि ध्यानाने किती शांत वाटतं ते...
किंवा ताण न घेता सारखं हसत राहणं किती महत्वाचं आहे ते!



तुम्हा सर्वांना ''वर्ल्ड हार्ट डे' च्या मनापासून शुभेच्छा!

1 comment:

A woman from India said...

बर्‍याच भारतियांना त्यांच्या खाण्याचा सवयींबद्द्ल खुप अभिमान असतो. पण ते खरे नाही - हॄदय रोग, अस्थिरोग तसेच मधुमेहाचे अत्याधिक प्रमाण सांगते की भारतिय आहार आणि जिवनशैलीमधे काही तरी सुधारणा करायला पाहिजे. गोड आणि स्निग्धं पदार्थांचे सेवन कमी करायला हवे - दिवसाची सुरुवातच साखर आणि दुध घातलेल्या चहा पासुन होते. आहारात भाज्या असल्या तरी त्या तेल घालुन भरपूर शिजवल्या जातात. त्यामुळे उरली सुरली जिवनसत्वे शारिरात विशेष एब्सॉर्स होत नाहीत.
शिवाय कार्डियो व्हॅस्क्युलर म्हणावा असा व्यायाम घडत नाही. व्यायाम केलाच तर तो चालण्याचा - तितका पुरेसा होत नाही.
शिवाय प्रदुषण आणि जिवनातील ताण तणाव.
हॄदय रोगाला आमंत्रण देणारी ही परिस्थिती बदलायला हवी.