मला नेहमी मानवी मनाचं आश्चर्य वाटतं!
आता श्रद्धा हाच विषय घ्या............
लोक आपले किती आंधळेपणानी श्रद्धा ठेवतात. गर्दी मागून जायची 'मासेस' ची ही मनोवॄत्ती अनाकलनीय आहे.
गुरुमहाराज, त्यांचेप्रती असणारं प्रेम, कुठलीही प्रचीती आल्यशिवाय असणारा उदंड विश्वास..सारेच मला तरी नवलाचे वाटते.
बरं त्यात सर्वच लोक असतात, जुने जाणते, नवे नवखे, स्त्रिया, पुरुष, डॉक्टर्स, पत्रकार, गायक, विमा एजंट्स,बिल्डर्स ..प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो, आणि ते काहीतरी सोल्यूशन मागायला येतात.
कस हे .?
1 comment:
खूप छान मुद्दा आहे. आपला कोणी तारणहार असावा असं लोकांना का वाटतं? "आलेल्या अडचणींना मला जमेल तसं मी स्वतःच तोंड देऊन त्याच्यातुन मार्ग काढीन" असं बहुतेकांना का वाटत नाही?
आपल्या तरुण पिढीमधे वैज्ञानिक द्रुष्टिकोन नसून अंधश्रद्धांचे प्रमाण वाढत असल्याची खंत नुकतीच नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञांनी व्यक्तं केली आहे.
बेजबाबदार प्रसारमाध्यमेही या सगळ्यांना खतपाणीच घालत असतात. नुकतेच बच्चन कुटंबानी ऐश्वर्या रायच्या मंगलदोष निवारणासाठी केलेल्या पुजेच्या बातम्या रकाने भरभरून प्रसिद्ध केल्या. याला काय म्हणावे?
Post a Comment