नुकताच मुन्नार ला भेट देण्याचा योग आला.....इतकं रमणीय आणि सुंदर ठिकाण आहे...!
मैलोनमैल पसरलेल्या, हिरव्यागार मखमालीने लपेटलेल्या तॄप्त टेकड्या, मधूनच डोकावणारा चुकार रस्ता, झरे, पाखरं.........सगळंच अगदी एखादा कॅनव्हास पहात असल्यासारखं...नीटस, रेखीव, देखणं........
चहाच्या मळ्यांमध्ये ते लोक जायला थोडी वाट ठेवतात...रोज-कॉलम्स मध्ये...नागमोडी........दुरून पहातांना प्रेस फ़िट च्या टाईल्स असतात नं...तसे आखीव पणे टी प्लॅंटेशन केल्यासारखे दिसते.....हिरव्या टाईल्स बसविल्यसारखे...
आणि त्याचा विस्तार तरी किती...नजर पोहोचेल तिथपर्यंत आपली लवलवती, मुलायम हिरवळ पसरलेली....
एका टिकाणाहून तर अगदी चित्रात काढतो तसे दृष्य होते....तळं, पक्षी, आकाश, डोंगर.........सारं काही जिथल्या तिथे...
धुकं आपलं अधिरपणे वर वर चढत येतं.....पुन्हा निवळतं..पुन्हा चढतं.....
तोच आशा अपेक्शांचा जीवघेणा खेळ............जुनाच..तरी प्रत्येक वेळी नवा वाटणारा.............
मुनार असं अंतर्मुख करतं........आपल्याजवळचं सारं काही भरभरून देउन टाकतं..... आणि दर वेळी पुन्हा निसर्गाचे सारे रंग उधळायला सज्ज होतं!
1 comment:
सुंदर वर्णन..
Post a Comment