आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!
छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!
मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...
फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!
साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.
त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!
6 comments:
आपल्या साहीत्य रसास्वादाला ही त्रिवार कुर्निसात.
मस्त लिहीलय.
जी एं ची विदुषकाची गोष्ट माझा आवडीची. बहुदा काजळमाया पुस्तकातील. कोणे एके काळी त्यांच्या पुस्तकांची पारायण केलेली.
आता परत पुन्हा एकदा वाचायला घ्यायला हवे.
hmm... GA..
GA is on my wishlist for a long time.. have read some of his Katha's - Swami, Radhi. I am BIG fan of his 'Bakhar Bimmachi'. I hope you have read that. If not, it's a must read.
Also, sunatabai's writing on GA is also nice read.
छान लिहीलं आहेस, लिहीत रहा
'baadha' kharach khoop sundar gosht ahe..sadhya ani thodkya shabdat g.a. khoop kahi sangun jatat.. nice that you wrote about it.
मी काल परवाच "बाधा" वाचली. जीएंच्या कथा वाचयला मी अशातच सुरुवात केली. पहिल्यांदा निळासावळा कथासंग्रह वाचून काढला, आता हिरवे रावे वाचत आहे.
मल कुतुहुल आहे की लोकांना जी.ए. का आवडत असावेत याबद्दल?
तुम्हाला ते का आवडतात?
मला हे तर नक्कीच जाणवले आहे, जेवढ्या कथा वाचल्या त्यावरून, कि कथा सांगाण्याची पद्धत आणि शैली अफाट ताकदीची आहे त्यांची.
पण अशा दुख्खद विषयांवरच कथा का?
अजून पूर्ण ते काही कळालं नाही.
नि अशा कथा वाचण्याने काय होणार?
का वाचायच्या, अशा कथा, हा प्रश्न?
त्याचं तुम्हाला काही उत्तर मिळालं का?
नीरज
Post a Comment