ते परत वडुर्याला परतले तेव्हाही केवल विचारमग्न होता. "काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत, निलो. आमूलाग्र बदलाची नितांत आवश्यकता आहे. विचारांत आणि त्या अनुषंगाने घडणार्या कृतींत.
या सर्वाला आज्जोंचे (डॉ. लेकशॉ त्याचे लाडके आज्जो होते!) संशोधन कसं अप्लाय करता येईल, याचा मी विचार करतो आहे. कारण आधुनिक साधनांची मदत घेतल्याखेरीज हे शक्य होणार नाही असे माझे मत होत चालले आहे.
त्यांचा नॅनो स्पिटिकल चा अभ्यास, चीरनिद्रा ड्रग, साधन सामुग्री विषय़ीचे त्यांचे संशोधन, ऑक्सिजन वरचा त्यांचा महत्वपूर्ण व्यासंग..या सर्वांचीच आपल्याला गरज भासणार आहे, मिशन अर्थ करता सुद्धा!
अत्यंत काळजी पूर्वक विचार करून आपल्याला ठरवावं लागेल." तो निलो ला उद्देशून पण स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला. "हो...मी उद्याच लायब्ररीत जाऊन जरा पुस्तकं धूंडाळते." निलोही गंभीर पणे उद्गारली.
दुसरा दिवस:
सर्वत्र अत्याधुनिक सरफ़ेस स्क्रीन्स लावलेल्या भव्य ई-वाचनालयात केवल आणि निलो शिरले तेव्हा दुपारचा एक वाजत होता. निलो ने आपला पासवर्ड दिल्यावर बरेच सेक्शन्स तिच्यासाठी खुले झाले. केवल ने टेक्नॉलॉजी तर निलो ने इतिहास असे ऑप्शन्स देवून पुस्तके ब्राऊजिंग करायला सुरुवात केली. बराच वेळ ते वाचनात गढून गेले होते.
निलोने वारंवार चेहेर्यावर येणार्या तिच्या डार्क ब्राऊन केसांच्या बटा डाव्या हाताने मागे ओढून धरल्या ती खुर्चीत थोडी रेलून बसली. अजिबात काळजी न घेताही दिसणार्या तिच्या अतिशय देखण्या, उत्फुल्ल चर्येकडे केवलचे लक्षच नव्हते.
त्याच्या कडे तिने अपेक्षेने पाहीले पण तो वाचनात आणि विचारांत इतका गढून गेला होता की तिच्या त्या मृदूल अपेक्षेची गंधवार्ताही त्याला मिळाली नाही
ती मनाशीच किंचीत हसली आणि तिने पुढे वाचायला सुरुवात केली. अचानक तिचे डोळे लकाकले.. तिने तो परिच्छेद पुन्हा वाचायला सुरुवात केली.
"स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन गेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले."
....निलो अचाम्बित होऊन व्हिलोकोविस सिंगनिझी बद्दल वचत होती. त्याचे काळाच्या पुढचे विचार, धरती चे रक्षण व संवर्धन यांविषयीची त्याची आत्यंतिक तळमळ, तंत्रज्ञानाचा त्याचा अभ्यास...सारेच विलक्षण होते.
"केवल....हे..हे वाच!" तिने त्याला हलवले.
1 comment:
The Final War is becoming more and more interesting
Post a Comment