पेच मोठा होता.. उत्तरे सहज नव्हती.
केवल ने निदांशी संपर्क साधला तेव्हा ते काही आकडेमोड करण्यात व्यस्त होते.
"सर, माझ्याकडे काही महत्वाची निरीक्षणे आहेत, काही निष्कर्षही आहेत. मला तातडीने आपला कायम स्वरूपी सभासद करुन घ्या. हे फार आवश्यक आहे, निकडीचंही आहे....वेळ ही फार कमी आहे आपल्याकडे , सर" त्याने आग्रही सुरात प्रतिपादले.
त्याच्या स्वरातील सच्चाई व कळकळ निदांना जाणवली असावी. तसेही ते अंतर्मनाची ग्वाही अधिक महत्वाची मानणार्यांपैकी होतेच. तरीही त्यांनी त्यांच्या जवळील छोट्या उपकरणाद्वारे केवल च्या रिक्वेस्ट ची ऑनेस्टी व ट्रस्ट तपासून बघीतली.
ती पुरेशी आढळताच त्यांनी लगेच ऑनलाईन सूचना देवून, त्याला उर्वरीत राईट्स देण्याची व्यवस्था केली.
दृष्य बदल :
"मिशन अर्थ" च्या छोटेखानी मिटींग रुम मध्ये अतिशय गोपनीय व फक्त अती विशिष्ट सभासदांची बैठक चालू होती.
निदां च्या विशेष विनंतीला मान देउन आज डॉ लेकशॉ उपस्थित होते.
"पण हे फार अवघड आहे, केवल, अशक्य कोटीतलंच म्हणता येईल असं..." डॉ लेकशॉंच्या स्वरात अविश्वास होता.
"पण आपण त्याची शक्याशक्यता पडताळून पहायला काय हरकत आहे? मला तरी तो एकमेव पर्याय दिसतो आहे. आपल्या नैतीकतेच्या आग्रहाशी, वैश्विक आणि पार्थिव भूमिकेशी सुसंगत असणारा एकमेव पर्याय!
केवल समर्थनार्थ उदगारला. "ही फक्त एक संकल्पना आहे. प्राथमिक स्वरुपात. आत्ता आपल्याकडे उपलब्ध असलेले रिसोर्सेस, उर्जा आणि तंत्रज्ञान, जे की आपण नॅनो स्पिटीकल वर जाण्यासठी वापरणार आहोत, तेच वापरुन, जर, कार्बन सायकल उलटी करण्याची प्रक्रिया सुरु करता आली..."
केवल च्या या प्रस्तावावर सारेच एकदम स्तब्ध झाले. त्याच्या शक्याशक्यतेची पडताळणी तेथे असणारे सारेच मनातल्या मनात करत होते.
"हे एक अंतीम युद्ध आहे...निकराचा प्रतिवाद...मानवाच्या लोप पावत जाणार्या संवेदनशीलतेचा अखेरचा यत्न.. याचे यशापयश कुणा एकाची मक्तेदारी नसेल. आपल्याला जगातील श्रेष्ठ शास्त्रज्ञांची मते आजमावी लागतील, अनेकांचे सल्ले घ्यावे लागतील, आणि त्यानुसार,.. ठरवावे लागेल.."
निदांनी संयत पणे सभेची सूत्रे हाती घेतली. "केवल, हीच कल्पना गेले कित्येक दिवस माझ्याही मनात घोळते आहे, पण मला ती फारशी अनुकूल वाटत नाही." त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Saturday, September 29, 2007
Friday, September 28, 2007
अंतीम युद्ध- भाग ७
विरीता विचारमग्न अवस्थेत बसून होती. मानवी स्वभाव हा सर्वाधिक अभ्यासाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे तिचे जुनेच मत होते. "इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या उलटल्या, तरिही, आपण त्याच त्या चुका पुनः पुनः करत राहतो.
जुन्या पिढीला कालबाह्य ठरवून, स्वतःला अधिक सक्षम,हुशार ठरवत आपण आपलं घोडं दामटत राहतो..आणि चुकत जातो. .अगदी र्हासाची, सर्वनाशाची वेळ आली तरी!" तिला वाटले.
तिच्या या तत्वज्ञानात्मक चिंतनाला कारणही तसेच होते.
केवलने नुकतेच "चीरनिद्रा" या विषया वर तिचे बौद्धिक घेतले होते. अनेक दिवस, अनेक वर्षे...झोपून रहायचे. शांत....फ़क्त श्वासोश्वास चालू म्हणून जिवंत म्हणायचे. बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ! आधी प्रोग्रॅम करुन झोपेची मुदत ठरवून ठेवायची. काळ जणू गोठवून ठेवायचा...आपल्यापुरता.
"कुठे जाणार आहोत आपण एक दिवस कोण जाणे..." ती हतबुद्ध होऊन उद्गारली. "पण पर्याय शोधण्यापलिकडे आपल्या हातात आहे तरी काय! तेच तर करत आलोय वर्षानुवर्षे.." तिला वाटले.
तिकडे केवल त्याच्या स्वतंत्र अभ्यासिकेत इंटेलिवर्क वर माहिती मिळविण्यात, ती तपासून पाहाण्यात गुंग झाला होता.
तो ज्या दिशेने विचार करीत होता त्या विषयाचा मूळ गाभाच तर तो होता. "रिव्हर्सल ऑफ़ कार्बन सायकल!...त्याला लागणारी प्रचंड उर्जा, प्रस्तावित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता, लागणारे तंत्रज्ञान,
त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव...आणि त्याचे सुदीर्घ फायदे!"

Friday, September 07, 2007
अंतिम युद्ध -भाग ६
ते परत वडुर्याला परतले तेव्हाही केवल विचारमग्न होता. "काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत, निलो. आमूलाग्र बदलाची नितांत आवश्यकता आहे. विचारांत आणि त्या अनुषंगाने घडणार्या कृतींत.
या सर्वाला आज्जोंचे (डॉ. लेकशॉ त्याचे लाडके आज्जो होते!) संशोधन कसं अप्लाय करता येईल, याचा मी विचार करतो आहे. कारण आधुनिक साधनांची मदत घेतल्याखेरीज हे शक्य होणार नाही असे माझे मत होत चालले आहे.
त्यांचा नॅनो स्पिटिकल चा अभ्यास, चीरनिद्रा ड्रग, साधन सामुग्री विषय़ीचे त्यांचे संशोधन, ऑक्सिजन वरचा त्यांचा महत्वपूर्ण व्यासंग..या सर्वांचीच आपल्याला गरज भासणार आहे, मिशन अर्थ करता सुद्धा!
अत्यंत काळजी पूर्वक विचार करून आपल्याला ठरवावं लागेल." तो निलो ला उद्देशून पण स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला. "हो...मी उद्याच लायब्ररीत जाऊन जरा पुस्तकं धूंडाळते." निलोही गंभीर पणे उद्गारली.
दुसरा दिवस:
सर्वत्र अत्याधुनिक सरफ़ेस स्क्रीन्स लावलेल्या भव्य ई-वाचनालयात केवल आणि निलो शिरले तेव्हा दुपारचा एक वाजत होता. निलो ने आपला पासवर्ड दिल्यावर बरेच सेक्शन्स तिच्यासाठी खुले झाले. केवल ने टेक्नॉलॉजी तर निलो ने इतिहास असे ऑप्शन्स देवून पुस्तके ब्राऊजिंग करायला सुरुवात केली. बराच वेळ ते वाचनात गढून गेले होते.
निलोने वारंवार चेहेर्यावर येणार्या तिच्या डार्क ब्राऊन केसांच्या बटा डाव्या हाताने मागे ओढून धरल्या ती खुर्चीत थोडी रेलून बसली. अजिबात काळजी न घेताही दिसणार्या तिच्या अतिशय देखण्या, उत्फुल्ल चर्येकडे केवलचे लक्षच नव्हते.
त्याच्या कडे तिने अपेक्षेने पाहीले पण तो वाचनात आणि विचारांत इतका गढून गेला होता की तिच्या त्या मृदूल अपेक्षेची गंधवार्ताही त्याला मिळाली नाही
ती मनाशीच किंचीत हसली आणि तिने पुढे वाचायला सुरुवात केली. अचानक तिचे डोळे लकाकले.. तिने तो परिच्छेद पुन्हा वाचायला सुरुवात केली.
"स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन गेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले."
....निलो अचाम्बित होऊन व्हिलोकोविस सिंगनिझी बद्दल वचत होती. त्याचे काळाच्या पुढचे विचार, धरती चे रक्षण व संवर्धन यांविषयीची त्याची आत्यंतिक तळमळ, तंत्रज्ञानाचा त्याचा अभ्यास...सारेच विलक्षण होते.
"केवल....हे..हे वाच!" तिने त्याला हलवले.

Subscribe to:
Posts (Atom)