"कसं काय" ब्लॉग वर यापूर्वी प्रसिद्ध झालेली ही विज्ञान काल्पनिका ! ती अपूर्ण वाटली अशी बर्याच वाचकांची प्रतिक्रिया आल्याने, एक अभिनव प्रयोग म्हणून मी ती पुढे लिहीत आहे. अर्थात लेखिकेच्या परवानगीनेच!
कसं काय च्या लेखिकेला अर्थात प्रश्नांची उत्तरं वाचकांकडूनच अभिप्रेत होती.
मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणिव आहे, व हा एक प्रयत्न आहे.
अंतीम युद्ध - फेज २
"आ स्स्स्स्.!" आंद्रेशा ने आळोखेपिळोखे देत आळस दिला. "हा दादा म्हणजे मुलखाचा झोपाळू. कधी लवकर उठणार नाही.." त्याचे पांघरुण सारखे करीत ती बाथरूम कडे वळली.
चादरी च्या आतून केवल ने डोळे किलकिले करुन तिच्याकडे पाहिले, आणि काहीतरी आठवून तो ताडकन् उठलाच. "बापरे! मला नऊ वाजता सेंटर् ला पोहोचायचं होतं. मी कल्टीकॅप ला फीड् केलं होतं. त्याने रिमाइंड् का नाही केलं..?"
तो मनाशीच पुटपुटत तयार् होत होता. "कल्टीकॅप माझा केअर टेकर् आहे दादा, मी तुला ऍक्सेस प्रोहिबिट् केला आहे"
आंद्रेशा आतून ओरडली.
तिच्याकडे रागारागाने पहात केवल ने निलोला कॉनफ़रंस वर घेतले. त्याच्या सेल च्या छोट्या स्क्रीन वर तिची छबी झळकली. "निलो, आज निदांना भेटायचे आहे, लक्षात् आहे ना?" "बट् ऑफ कोर्स.." ती हसत् हसत् म्हणत होती.
केवल ने मग भराभर आवरले आणि कार ला डेस्टिनेशन फ़ीड करून तो निघालाच.
हायवे नं ४/अ-३ वर निलो त्याची वाटच पहात होती. "हाय केवल..!" तिने त्याची गाडी दिसताच स्वतःच्या सेलवरून इंटरप्ट दिला. पासवर्ड एंटर केल्यावर कार बरोब्बर तिच्या पुढ्यात थांबली. दरवाजे आपोआप उघडले. "केवल...तुला कधी वेळेत पोहोचता येईल का?" पुस्तक वाचत असलेल्या केवलला हलवत तिने विचारले "ओह, निलो, तू आलिस सुध्दा? मला कळलेच नाही. जुन्या भारत देशाचं इतकं
छान वर्णन आहे. लोक काय सुखि होते पूर्वी! नळाला धो धो पाणी यायचं, लोक डॉर्म मध्ये नाही तर स्वतंत्र पणे रहायचे, फळं फुलं मुबलक असायची, प्रत्येक तरुणाकडे बाईक असायची, रस्ते फ़्री असायचे... नाहीतर आता..कुठे निघायचं असेल तर तास भर आधी रोड ऍक्सेस बुक करावा लागतो..!" तो अर्धवट स्वतःशी व अर्धवट तिच्याशी बोलत होता.
"कमॉन, केवल.. वी मस्ट रश.."ती फारसे लक्ष न देता म्हणाली.
निदां कडे ते पोहोचले तेव्हा नऊ वजून गेले होते.
1 comment:
सुरूवात (?) छान झाली आहे. आता पुढे काय होतंय याची उत्सुकता आहे.
Post a Comment