स्वयंशिस्त, नीट्नेटकेपणा आणि एकूणच 'अभिजातता' ही अनुवंशिक असते असे मला वाटू लागले आहे.
म्हणजे काही लोकांची सामान्यतः बोलण्याची स्टाईल, एकूण व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिक्रिया...सारंच कसं अगदी तोलून, पारखून, 'रिच' असतं........लूज टॉक्स नाहीत, फ़ालतू हसणे नाही, बोजड अपेक्षाही नाहीत.
आणि मला हेही पटलं आहे की आपण कितीही आव आणला तरी मूळ आडातच नाही तर पोहोर्यात येणार कुठून?
पण जेव्हा जमेल तेव्हा, अशा उच्च अभिरुचीच्या माणसांच्या सहवासात वेळ घालवून आपले आयुष्य थोडे समृद्ध तर करता येईल!
खरंच! आयुष्य जगण्याच्याही किती तर्हा असू शकतात नाही?
असं चाखत चाखत, रुचीने, सवडीने जगता यायला हवं. नव्हे, ते तसं जाणिवपूर्वक जगायला हवं...पण रोजच्या लढाईत आपण ती कोवळीक कधी हरवून बसतो तेही समजत नाही.
आणि दर वेळी सुखा आनंदाच्या, खर्च- खरेदीच्या क्षणी डोकं वर काढणारी ती खास मध्यमवर्गीय अपराधीपणाची जाणिव!
मूल्यं आणि तत्वं यांच्या कोषात लपेटलेली.....
पारंपारिकतेच्या अश्या विळख्यांमधून सुटणं किती अवघड आहे.
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Thursday, June 07, 2007
Wednesday, June 06, 2007
बंद झाली कवाडं...मन खुलता खुलेना
मला सद्ध्या राईटर्स ब्लॉक का काहिसं म्हणतात नं.....तो आलाय असं वाटू लागलं आहे.
त्यामुळे प्रतिभेचा प्रवाह काही केल्या खुलाच होत नाहिये.
ट्युलिप ने हे अगदी छान पणे मांडलं आहे.......कशावर लिहावं ....
......
जगजित चित्रा च्या हळुवार गझला, गुलाम अलिंचा आर्त पिळवटून टाकणारा सूर आणि बरंच काय काय आवडायचं.........
आता पडणारा पाऊस, गवतावरचे दवबिंदू किंवा पानगळीनंतरच्या पाचोळ्याचा चुर चूर आवाज...काही म्हणता काहीच मनाला भावत कसं नाही?
आयुष्य असं विरामचिन्हं विरहीत, प्लेन टेक्स्ट कसं काय झालं?
ग्रेस च्या कवितांचे अर्थ, जी एंच्या निर्व्याज गाभ्याच्या खोलवर भिडणार्या आर्त कथा, कायम आवडणारा चित्रपट 'सिलसिला', गौरी ची मुक्त अनिर्बंध स्त्री, सारं जग पिऊ पिऊ म्हणणारी कांक्शा........मनाचे हे सवंगडी आता पिंगा घालत नाहीत भोवती.......दुसरीच कसली तरी अपरिचीत जाणिव व्यापत जाते मन आताशा....
समर्पित केल्याची, (की आवाज हरविल्याची?)

Tuesday, May 15, 2007
पाककृती - कढीगोळे
आज मी तुम्हाला एका छान पदार्थाची कृती सांगणार आहे. -कढीगोळे.
हरभरा डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर निथळून, वाटून घ्यावी. त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, थोडे लाल तिखट इ घालून मिसळून घ्यावे.
जरा आंबट ताकाची कढीपत्ता, मेथ्या इ. घालून कढी करावी. तिला उकळी आली की मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यात सोडावेत आणि मंद आचेवर चांगले शिजू द्यावे. गोळे सोडल्यावर लगेच ढवळू नये.
वाढतांना लाल मिरच्या तळून फ़ोडणी करावी व गरम भाकरी अगर भाताबरोबर खावे.
सूचना - कढीत बेसन जरा कमी घालावे नाहीतर नंतर फ़ार दाट होते.
प्रकार : हरभरा डाळी ऐवजी ओले हरभरे, ओले तूरीचे दाणे, मूगाची डाळ ही वापरता येईल.

Thursday, March 22, 2007
वॉटर
बहुचर्चित वॉटर सिनेमा बघितला. त्यातल्या तरलते विषयी, सहज फ़ुलत जाणार्या, शब्दांमध्ये फ़ार अडकून न पडता प्रवाही असणार्या पटकथे विषयी मला काही म्हणायचे नाही...पण मूळातला विषयच जरा एकांगी पणे मांडलेला वाटतो. त्यामुळे भारतात आजही विधवांना दिल्या जाणार्या वागणूकी विषयी गैर समज होण्याची जास्त शक्यता आहे. (किंवा तो तसा व्हावा असाच प्रयत्न आहे.)
एखाद्या संस्कृतीच्या, तत्वाच्या, प्रणालीच्या महानते बरोबरच काही त्रुटि, कमतरता या असतातच...त्यांना किती उदात्त करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नाहीतर अनेक प्रसंगां मध्ये हिंदू धर्माने स्त्रियांना दिलेला मान सन्मान असा डावलला गेला नसता.
आणि विधवा तरी काय सगळ्या च अशा कमनशिबी थोडीच होत्या!
महाराष्ट्रात तर किती उज्ज्वल परंपरा आहे. माधव राव पेशव्यांच्या आई गोपिका बाईंपासून अनेक कर्तबगार स्त्रिया येथे होऊन गेल्या.
मान्य आहे की मूठभर का होइना, पण स्त्रियांना असा वनवास नशिबी आला...जिथून कुठलंच बाहेरचं दार उघडत नाही असा बंदिवास आयुष्य भर... तेही न केलेल्या चुकी साठी भोगावा लागला....
पण काळोखाला असलेली उजेडाची किनार दुर्लक्षून कसं चालेल?
अर्थात चित्रपटाला असणारी सगळी परिमाणं लावली तरी हा एक सुरेख चित्रपट आहे.
शेवटचा गांधींचा स्पीच जरा irrelevant वाटतो. त्यातून काहीच अभिप्रेत होत नाही.
सरला ने छुईया फ़ार गोड रंगविली आहे. तिच्या साठी हा सिनेमा बघायलाच हवा. आणि आपण असे नाही आहोत हे जगाला ओरडून सांगण्या साठी ही बघायलाच हवा

Wednesday, March 07, 2007
महिला दिन
आज जागतिक महिला दिन.........
अनेक शुभेच्छा!..........सगळ्या स्त्रियांना, कामकरी, कष्टकरी मोलकरणीपासून ते आय सी आय सी आय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत, आय आय टी त ल्या गायत्री पासून संगीता च्या येसाबाई पर्यंत, सर्व मानिनिंचा मी गौरव करू इच्छिते!
स्त्री च्या सर्जनशीलतेला, सहनशक्तीला, तरलतेला, ...........उत्कट,आसूसून केलेल्या प्रितीला, पिल्लांसाठी प्रसंगी चवताळून उठणार्या तिच्यातील वाघिणीला आणि अशाच तिच्या असंख्य गुणांना अनेक शुभेच्छा!
हे जग अधिक सुंदर करण्याचं महत्व मोलाचं काम........तिचंच तर आहे!
तिची इर्ष्या, तिची भरारी, तिची दृष्टी...आणि तिचे आसू, तिचा कमकुवत पणा, तिचे चुकीचे निर्णय.....
कधी वर कधी खाली झुलणारा भावनांचा हिंदोळा.......
स्त्रित्वाच्या अनेक विलोभनीय पैलूंना झळाळी मिळो.........तिच्याच अंगभूत तेजाने ती अधिकाधिक तळपो या मनापासून सदिच्छा!

Monday, March 05, 2007
धारा
मध्ये एक चांगलं पुस्तक वाचनात आलं.........इंदिरा रायसम गोस्वामी चं....आधालेखा दस्तावेज - त्याचं भाषांतर - "अर्धिमुर्धी कहाणी".......
वृंदावन मध्ये असतांना तिला आलेले विलक्षण अनुभव आणि विशेषतः श्रीकृष्णाबद्दल तिचं चिंतन वाचण्यासारखं आहे. तिचं म्हणणं अस आहे की आपण सर्वच जण श्रीकृष्णाच्या त्याच त्या राजस, लडिवाळ रुपावर प्रेम करीत राह्तो, गोकुळातला रास खेळणारा, लोणी चोरणारा श्याम.............पण त्याचं पूर्ण रुप आपण कितीसं अभ्यासतो? तिला कायम श्रीकृष्ण एक व्यक्ती म्हणून बघावासा वाटतो!
देवत्वा पेक्षाही श्रीकृष्णाला आपल्यातलाच एक समजण्याची ही संकल्पना जरा जास्त 'आपली' वाटते.
.......भारतीय भक्तीच्या सुद्धा किती तरी धारा आहेत.....चैतन्य महाप्रभूंच्या मधुरा भक्ती पासून दत्तात्रेयांच्या कर्मठ साधनेपर्यंत.......
कदाचित हाही एक भक्तीचाच मार्ग असेल.........

Sunday, March 04, 2007
पाककृती
मी आज तुम्हाला एक नवीन डिश सांगणार आहे..........
साबुदाणा - वाटली डाळ यांचा उपमा
एक वाटी साबुदाणा व एक वाटी हरभरा डाळ रात्री भिजत घालून ठेवावे. दुसर्या दिवशी सकाळी डाळ उपसून वाटून घ्यावी. कढईत तेलाची फ़ोडणी करुन त्यात मिरचीचे तुकडे, कढी पत्ता, हिंग वगैरे घालून, त्यावर डाळ घालावी व एक वाफ़ आल्यावर, साबुदाणा घालून पुन्हा चांगले परतावे व वाफ़ आणावी. चवीला मीठ, साखर, लिंबू पिळून व कोथिंबीर -खोबरे घालून गरम गरम सर्व्ह करावे.

Subscribe to:
Posts (Atom)