मला सद्ध्या राईटर्स ब्लॉक का काहिसं म्हणतात नं.....तो आलाय असं वाटू लागलं आहे.
त्यामुळे प्रतिभेचा प्रवाह काही केल्या खुलाच होत नाहिये.
ट्युलिप ने हे अगदी छान पणे मांडलं आहे.......कशावर लिहावं ....
......
जगजित चित्रा च्या हळुवार गझला, गुलाम अलिंचा आर्त पिळवटून टाकणारा सूर आणि बरंच काय काय आवडायचं.........
आता पडणारा पाऊस, गवतावरचे दवबिंदू किंवा पानगळीनंतरच्या पाचोळ्याचा चुर चूर आवाज...काही म्हणता काहीच मनाला भावत कसं नाही?
आयुष्य असं विरामचिन्हं विरहीत, प्लेन टेक्स्ट कसं काय झालं?
ग्रेस च्या कवितांचे अर्थ, जी एंच्या निर्व्याज गाभ्याच्या खोलवर भिडणार्या आर्त कथा, कायम आवडणारा चित्रपट 'सिलसिला', गौरी ची मुक्त अनिर्बंध स्त्री, सारं जग पिऊ पिऊ म्हणणारी कांक्शा........मनाचे हे सवंगडी आता पिंगा घालत नाहीत भोवती.......दुसरीच कसली तरी अपरिचीत जाणिव व्यापत जाते मन आताशा....
समर्पित केल्याची, (की आवाज हरविल्याची?)
1 comment:
तुझ्या प्रतिभेला ब्लॉक नं करता ब्लॉग कर. लिहायला लाग, येईल मूड.
तू वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिही एखाद्या.
Post a Comment