आज जागतिक महिला दिन.........
अनेक शुभेच्छा!..........सगळ्या स्त्रियांना, कामकरी, कष्टकरी मोलकरणीपासून ते आय सी आय सी आय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत, आय आय टी त ल्या गायत्री पासून संगीता च्या येसाबाई पर्यंत, सर्व मानिनिंचा मी गौरव करू इच्छिते!
स्त्री च्या सर्जनशीलतेला, सहनशक्तीला, तरलतेला, ...........उत्कट,आसूसून केलेल्या प्रितीला, पिल्लांसाठी प्रसंगी चवताळून उठणार्या तिच्यातील वाघिणीला आणि अशाच तिच्या असंख्य गुणांना अनेक शुभेच्छा!
हे जग अधिक सुंदर करण्याचं महत्व मोलाचं काम........तिचंच तर आहे!
तिची इर्ष्या, तिची भरारी, तिची दृष्टी...आणि तिचे आसू, तिचा कमकुवत पणा, तिचे चुकीचे निर्णय.....
कधी वर कधी खाली झुलणारा भावनांचा हिंदोळा.......
स्त्रित्वाच्या अनेक विलोभनीय पैलूंना झळाळी मिळो.........तिच्याच अंगभूत तेजाने ती अधिकाधिक तळपो या मनापासून सदिच्छा!
3 comments:
छान. महिला दिनाच्या तुलाही शुभेच्छा!
तुझा लिखाण असंच नेहेमी वाचायला मिळो अशी इच्छा व्यक्तं करते, आणि फोटो छान टाकला आहेस,भरगच्च्च फुलांच्या पार्श्वभूमीवरचा.
खरय. आज जागतिक महिला दिन म्हट्ल्यावर मला पहिल्यादा बैलाचा पोळा हा सण आठवला, आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार आणि उद्द्यापासुन पसत त्या कामाच्या घाण्याला जुपल्या जाणार.
प्ररतु आता चित्र नक्कीच बदलत चाललय.
http://harekrishnaji.blogspot.com/2007/03/international-womens-day.html
गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.
Post a Comment