Saturday, September 27, 2014

कंचनीचा महाल

मेहेकर येथे गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा आहे. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो. त्याबद्दल एक आख्यायीका आहे. कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. नदीकिनारी तिचा प्रासाद होता. घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ . तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली...... कवी ना घ देशपांडे यांची नितांतसुंदर कविता..कंचनी चा महाल.....



अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ... क्रमश:

2 comments:

Vijay Shendge said...

खूप छान लिहिलंत. असेच माझ्या ब्लोवरील कवितांचे रसग्रहण केलेत तर आनंद वाटेल. अर्थात त्या कविता तुम्हाला तेवढया पात्रतेच्या असतील तरच.

तुम्ही माझ्या शरद पवारांची गुगली या लेखाला दिलेल्या प्रतिक्रियेचा उत्तर दिलं आहे. तिकडून इकडे वळालो. आपला ब्लॉग अधूनमधून पहात असतो. असेच वरचेवर भेटत राहू.

Vijay Shendge said...

आपली पोस्ट आवडली.
आपण नियमित लिहित नाही त्यामुळे आपल्या ब्लॉगला आठवणीने भेट देणे होत नाही. पण आज आपल्या ब्लॉगला भेट दिली. आपण माझ्या प्रतिक्रियेला दिलेल्या उत्तरात आपण माझा विजेत कोड आपल्या ब्लॉगवर चिटकविल्याचे वाचले. आपण माझे विजेट कोड आपल्या ब्लॉगवर चिटकविल्यानंतर मला इमेल केला नसेल. पण आज मी आपल्या ब्लॉगवरील विजेटकोड पाहिल्यानंतर लगेच आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडला आहे. आता तुमची नव्याने लिहिलेल्या पोस्टचा काही अंश माझ्या ब्लॉगवर दिसू लागेल आणि वाचकांना माझ्या ब्लॉगवरून आपल्या ब्लॉगवर पोहचणे शक्य होईल.