Thursday, January 15, 2015

तुझ्यात जीव गुंतला

अमिता आणि निनाद....खूप जवळचे मित्र...कॉलेजात, ट्रेकिंग मध्ये..हसण्या-बोलण्यातले अगदी जीवश्च कंठश्च.....
कॉलेज नंतर निनाद औरंगाबादला गेला नोकरीला आणि अमिता पुण्याला ....पुढे शिकायला.
पण एकमेकांना नियमित पत्रं लिहीणे चालूच होते.  एकदा अशीच अमिता नागपूरहून पुण्याला येत असतांना मध्ये बस औरंगाबादला थांबली...निनाद ला ठाऊक होतेच की ती या बस मध्ये आहे. तो तिला भेटायला आला होता..तिला फार आनंद झाला त्याला पाहून...हाय हॅलो झाल्यावर तो म्हणे...की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...प्लीज रुमवर चल. तिने काही आढेवेढे घेतले पण निनादवरचा विश्वास इतका गाढ होता की ती त्याच्या आग्रहाला बळी पडून उतरली व रुमवर गेली. तिथे त्याने तिची काही पत्रे दाखवली ज्यावर अगदी भसाड्या अक्षरांत आय लव्ह यू असे लिहीलेले होते....प्रक्षिप्त.
ती चक्रावलीच. अमिताने असे काही लिहून पाठविल्याचा सपशेल इन्कार केला व ती परतली.
हे प्रकरण तिथेच संपले. नंतर निनाद ने तिला म्हटले की ते काहीही असले तरी मला तुझ्या कडून पॉझिटीव्ह उत्तर हवे आहे.....पण अमिता ला तसे कधीच वाटत नव्हते.....तिने नाही म्हटले....व तिच्या तर्फे त्या प्रकरणाचा पूर्ण विराम केला.
नंतर मात्र दोघांचेही मार्ग भिन्न झाले. अमिता एका उद्योग पतीशी विवाह करुन प्रतिष्ठीत घराण्याची सून बनली तर निनादनेही एका सुंदर मुलीशी लग्न करुन संसार थाटला...

२० -२१ वर्षांनी त्यांची गाठ अचानक एका मित्राकडे पडली. दोघेही थोडे अवघडले होते....
पण निनाद मात्र पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडला...त्याची जुनी आठवण पुन्हा जागी झाली...अमिताचे सदाबहार हसू, तिचा ऋजू समजूतदारपणा, वयाने जराही न बदललेलं तिचं तारुण्य आणि उलट स्थिरतेमुळे आणि अधिकाराने अधिकच खुललेलं तिचं रुप.......

निनाद ला अगदी वेडं व्हायला झालं होतं. तो तिला सारखे व्हॉटसॲप वर व फेसबुक वर मेसेजेस पठवू लागला.  . अमिता ने पहिल्यांदा त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला की हे योग्य नाही. ती आता एका जबाबदार व्यक्तीची पत्नी आहे.....व तसेही तिने कधीही त्याच्यवर प्रेम केले नव्हते.  निनादही खरे तर हुशार होता, समजदार होता...पण तिच्या बाबतीत मात्र तो फार हळवा झाला होता....
अमिता ने त्याला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला....पण त्याचे एकच म्हणणे..की मलाही माहिती आहे की आपण आता एकत्र नाहीच येऊ शकत...पण मला फक्त तुझ्या बद्दलचे हे प्रेम व्यक्त करु दे. बाकी काही नाही...त्यामुळे मला खूप समाधान मिळते व आनंद मिळतो.
अमिता काळजीत पडली ...हे असे मेसेजेस तिच्या नवर्‍याने वाचले असते तर समस्या निर्माण झाली असती.....
अमिता मात्र त्याला कधीच प्रोत्साहन देत नव्हती....वेळोवेळी ती त्याला वस्तुस्थितीची जाणीव करुन देई...पण तो अधिकच गुंतत चालला होता.. प्रितीची ही रीतच न्यारी होती. कदाचित प्रेमाची ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसेल. पण अमिताच्या हसर्‍या छबी, तिचे फ्रेश स्मितहास्य, तिची बांधेसूद कोवळीक त्याला वेड लावत होती हे खरे...म्हणजे आधी नसेल गुंतला इतका तो तिच्यात गुंतत चालला होता.

क्रमशः

4 comments:

Vijay Shendge said...

आपलं नवीन लेखन ' रिमझिम पाऊस ' च्या डाव्या बाजूला दिसत आहे.आपण ' तुझ्यात जीव गुंतला ' हि क्रमश कथा लिहिणे सुरु केल्याचे तिथूनच कळाले. सुरवात छान केली आहे. अश्याच लिहित्या रहा.

पंकज वळवी said...

tumche likhaan khup chhan aahe...

Vijay Shendge said...

आंबट - गोड माझ्या ' शिणल्यावरती मात्र सख्या रे …. ' या कवितेवरील अभिप्रायाला उत्तर दिले आहे. नक्की पहावे.

Vijay Shendge said...

मी नेहमीच तुमच्या लिखाणाची आणि प्रतिक्रियांची वाट पहात असतो. पण आपण बऱ्याच दिवसात काही लिहिलेले दिसले नाही. परंतु प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार. मला ' लिहिते रहा ' अशा प्रेरित करणाऱ्या आपण मात्र नियमित लिहित नाही याचे वाईट वाटते. आपल्या संपर्काचा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे इथे भावना व्यक्त कराव्या लागतात. उत्तर मिळावे.