Monday, April 21, 2014

Heartfelt!

आज अगदी वैतागाचाच दिवस होता. सकाळी दूधवाल्याने एकदम साडेतीन लिटर दूध दिले....आज ऑफीस ला सुट्टी...त्याला सांगायचे राहीलेच. आता दही विरजून बांधा! नंतर पेस्ट संपली म्हणून कनकची आरडाओरड आणि झोप मोडली म्हणून रजत ची तार स्वरात तक्रार! अरे, काय मुलं आहेत का कोण ही! माझी मदतनीस , संध्या येणार होती दुपारी...तिच्या ’स्पेशल’ चकल्या आणि चिरोटे घेऊन तर बाईसाहेब आल्याच नाहीत....आजारी आहे म्हणे!....माझा भिशीचा प्लॅन होता गरम मटार कचोर्‍या, गरम शेव, दही-बटाटे व उसाचा रस...असा खास ’इंदोरचा’ मेनू ठेवणार होते..सराफ्यातल्या सारखा तर..... ! आता भेळ-आईस्क्रीम असा महाराष्ट्रीयन मेनूच ठेवावा लागणार बहुतेक. आणि बायका तरी काय...दागिने आणि पदार्थ आणि रिलेशन्स ...यावरच बोलतात. हिर्‍यांचे मंगळ सूत्र आणि कानातले ...मी नाही आणत म्हणे..नवराच माझा आणतो... काय काय.....त्यालाच आवड आहे! (?!) .... इतका हौशी नवरा आणि इतकी अरसिक बायको...?हॅलो...! काही लोकांचं संभाषण ऐकत होते...जर बायको काही दिवस कुठे गावाला गेली...” तर त्याचं काय...तो काय हाताने करुन खाईल काय...?” अरे!.....? हाताने करुन खाणे म्हणजे काय कमी पणा आहे? ती नाही खात ते रोज? मला असे बायकांना डॉमिनेट करणारे, कोत्या विचारांचे , कधीही कुणालाही चांगलं न म्हणणारे, सदैव स्वतःच्याच विचारात मग्न राहणारे लोक आवडत नाहीत अजिबात...... मानाचे भुकेले पण कर्तृत्वशून्य, कपबशी साधी उचलून सुद्धा न ठेवणारे, स्वयंपाक हा सर्वस्वी बायकांचाच प्रांत असे मानणारे पण टीका करण्यास पुढे असणारे, शिळं अजिबात न खाणारे, सदैव ही भाजी कशाची, काय , त्याने काय अपाय होतो, त्यात काय आहे....असा चुकीचा विचार करणारे, कुठलाही नवा पदार्थ चिवडत चिवडत संशयी वृत्तीने खाणारे, कर्मकांड करणारे, स्वप्ने पडल्यावर उठून तसे तसे कर्मकांड करणारे, भीत.......मला का अशा लोकांच्या सहवासात रहावे लागते......! देवा! कधी वाटते की मी निश्चित पणे याहून अधिक वर्थ होते ! कशा यांच्या समजुती! मुलांना काही काम सांगायला नको...मुलींनी केलेले चाले्ल. सतत सूचना, निगेटिव्हीटी, ....

2 comments:

Vijay Shendge said...

तुमच्या ब्लॉगला भेट दिली. ब्लॉग जेवढा चांगला सजवलाय तेवढच चांगल लिहिलायसुद्धा. माझ्या ब्लॉगचा विजेटकोड आपल्याला आपल्या ब्लॉगवर लावायचा आहे त्यासंदर्भात आपल्याला मेल पाठवली आहे. गरज वाटल्यास ९४२२३५६८२३ या क्रमांकावर संपर्क साधायला हरकत नाही.

मन कस्तुरी रे.. said...

धन्यवाद, विजय. मला वाटते मी बहुतेक विजेट कोड लावला आहे. प्लीज चेक करा.