नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!
नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्या जाणार्यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सुर्या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.
१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.
"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...
खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.
आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.
14 comments:
100% sahmat!
can I get its e copy on net?
plz give me its link
Thank you, Dhananjay.
Mess up in thought, I don't think it is available online. We need to find out.
(btw, why have you taken such vague name?)
Ashwini
शाळा पुस्तक अप्रतिम आहे हे खरेच. पुस्तकातला नायक तरीही सुदैवी होता. . .आमची शाळा फक्त मुलांची होती. :ड्
बाकी 'मेस अप इन थॉट', आपण पुस्तक विकत घ्यावे ही विनंती. . .परदेशात असाल तर भारतातून मागवावे.
अमित
aajach ShaaLaa tisaryaandaa vaachaayalaa ghetaley :)
'mess up in thought' pustak online ithe milel - http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16280&cat=266&page=4
वाचायलाच हव
Khar aahe, Ekadam Zakkas lekhanashailee aahe ...
Mi te pustak asech ekaa blog warachaa abhpraay vaachoo thet punyyavarron via courier magavale hote. Aalyywar eka baithakit vachun kadhale...
Nakki vachaa ...
Are u there ? nothing new on blog ?
Ata eka tasapurvich maza shala vachun zala ani achanak mala tuza blog sapadala...thats a coincidence! Somehow tyacha shevat ajun thoda vegla asava ase watat hote...neverthless..reading was very interesting.
Thank you, Parag.
I liked the style of writing...simple everyday situations...described greatly.
Ashwini
next ??????
माझे सर्वात आवडते पुस्तक. शाळेत गेलेल्या प्रत्येकाने जरुर वाचावे. पण खरच खूप Nostalgic व्हायला होते.
आणि मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. मिलिंद बोकील यांनी आता शिरोडकरच्या बाजुने पुस्तक लिहावे.
शाळेबद्दल येथे वाचल्यानंतर हे पुस्तक वाचण्यासाठी मी तडफडत होते, आज हे पुस्तक वाचनालयात मिळाले, वाचायला सुरवात आहे
Shala pustak atishay vastav paristhitivar adharit ahe. pustak vachlyanantar te shalet gelelya pratyekala swatache atmacharitra vatate.
Post a Comment