टीप : कार्बन सायकल :
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडण्याचे व पुन्हा ऍब्सॉर्ब हॊण्याचे चक्र. वाढत्या औद्योगिकिकरणामुळे व बेफ़िकिर,अनिर्बंध प्लास्टिक,पेट्रोल वापरामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण लक्षणीय रित्या वाढते आहे. त्यामुळे पृथ्वीला आतील उष्णता बाहेर न जाऊ देणारे एक घातक आवरण तयार होते आहे.
त्यामुळे आपली पृथ्वी हळूहळू पण निश्चित पणे तप्त होत आहे. गेल्या ५० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान .६ डिग्रीज ने वाढले आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरचे सारे जीवन धोक्यात येईल. म्हणून ही साखळी नियंत्रित करुन उलटी फिरविण्याची गरज आहे, जेणेकरुन, पृथ्वीवर ऑक्सिजन- ओझोन चे प्रमाण वाधेल व संतुलन होईल.
हे अर्थात आपणा सर्वांच्या सवयी, विचार आचाराच्या पद्धती, समज यांत आमूलाग्र बदल केल्यासच शक्य होणार आहे.
(पण इथे मी, ते शास्त्रज्ञांनी काही उपकरणांद्वारे व तंत्रज्ञानाद्वारे, मशीन्स ने अंमलात आणले असे दाखविले आहे.)
थोडाफार ऑक्सिजन कृत्रीम रित्या बनविणे शक्य होईलही ...पण पूर्ण साखळी च उलटी फिरविणे हे आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे!
१० डिसें ५०३७
विरीताने क्षीण नजरेने खिडकी बाहेर बघण्याचा यत्न केला. त्या महत्वाकांक्षी प्रयोगाला आज तब्बल तीस वर्षे उलटली होती.
"म्हातारे झालो आपण आता..." ती मनाशीच उद्गारली.
ती हळूहळू चालत बाहेरच्या पोर्च मध्ये आली.
2 comments:
२१ ऑगस्टपासून तू ह्या दुसऱ्या अध्यायाचे पुढचे भाग लिहीते आहेस. आता ५ महिने व्हायला आलेत - तुझ्या चिकाटीची खरंच दाद दिली पाहिजे! तुझ्या जागी दुसरं कुणी असतं तर केव्हाच स्टोरी गुंढाळून टाकून संपवून हात झटकले असते!
आम्ही एक STY लिहायला घेतला होता तर तो फ़सफ़सून वर येवून लगेच मरूनही पडला १०-१५ दिवसांत! :)
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
Post a Comment