दहा महिन्यांच्या अविश्रांत परिश्रमांनंतर प्रोजेक्ट ची रुपरेषा तयार झाली. सद्ध्या उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उर्जा कार्बन सायकल च्या उलट प्रक्रियेस पुरेसे आहेत यावर कुणाचेच दुमत नव्हते.
फक्त त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता, स्फोट, वावटळी मानव कितपत साहू शकतील हाच मुद्दा होता. त्यासाठी चीर निद्रेचा पर्याय सुचविण्यात आला होता.
खोल समुद्राच्या तळाशी मोठी विवरं बांधून त्यात चीर निद्रे साठी झोपून जायचे...बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ.....
दृष्य बदल:
केवल चा चेहेरा विमनस्क होता. "पण का, आजी-आज्जो आणि आई तू सुद्धा.... सहभागी होता येणार नाही म्हणजे काय? या उपक्रमाचे आपण च तर उद्गाते आहोत...आणि आता तुम्हीच अशी कच खाल तर कसं होणार?" तो मोजून नवव्यांदा विरिता ला म्हणाला.
"नाही रे, कच खाण्याचा प्रश्नच नाही...आणि आमचा तुझ्यावर, तुझ्या सद्सद विवेक बुद्धी वर पूर्ण विश्वास आहे. पण आम्ही मात्र इथेच रहायचा निर्णय घेतला आहे. भावी पिढ्यांना उगवती ची दारे खुली करुन देतांनाच, आम्हाला मात्र या संहाराचे साक्षीदार व्हायला आवडेल. हा तरी एक अनुभवच आहे नं , केवल..
पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज काही जणांनी तरी त्याग सोसायलाच हवा, आजपर्यंतच्या आपल्या बेलगाम वागण्याचे क्षालन म्हण हवे तर. या बलीदानामुळे तुम्हाला मिळाल्याच तर काही गुड विल्स मिळोत." विरीता त्याला समजावत म्हणाली.
केवल ला काही ते फार पटलेले दिसले नाही.
वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे प्रयत्न चालू होते. पद्मनाभ यांनी एका विश्व प्रार्थनेचे आयोजन केले होते. शिखर व त्याच्या ग्रुप ने जन जागरणाची व्यापक मोहीम आखली होती. विशेषतः लहान मुले डोळ्यापुढे ठेवून त्यांचे जागृतीचे काम चालले होते.
आधुनिक संपर्क साधनांमुळे जग अगदीच जवळ आले होते. त्यांमुळे बर्याच गोष्टी सुलभ झाल्या होत्या. अर्थात मानवी स्वभावाच्या अनेक कंगोर्यांचा प्रश्न होताच. प्रत्येकाच्या वेगळ्या शंका आणि त्यांचे निरसन करण्यानेच शिखर-विरीता थकून गेले होते.
4 comments:
पुढे काय ?
why status quo ?
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
युद्धबंदी केव्हा मागे घेतली जाणार ?
Post a Comment