Thursday, June 28, 2007

अद्न्यानातलं सुख

आत्ता 'मराठी चित्रपटातील गाणी' वर ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' वाचलं!
मलाच नवल वाटलं...गेली कित्येक वर्षं मी हे गाणं ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुच्छता मोठी....असंच म्हणत होते....मला असं वाटायचं देखिल की भेटीत 'तुच्छता' कशी काय असू शकेल बुवा..? पण म्हटलं की असेल काही...
तर आज तो फंडा क्लिअर झाला....


आपण किती गाढ अनभिद्न्यता बाळगत असतो!

6 comments:

A woman from India said...

आणि मला वाटत होतं की "तुटून पडल्या गाठी" आहेत!

Devidas Deshpande said...

...आणि आणखी एक, हे गाणं चित्रपटातील नाही; तर ‘देव दिनाघरी धावला,’ या नाटकातील आहे.

मन कस्तुरी रे.. said...

धन्यवाद देविदास, या माहिती बद्दल.
आणि द्न्यानेश्वर मधला "द्न्य" कसा लिहायचा बारहात ते कुणी सांगेल का?


संगीता,
आता मुळात गाठीच तुटून पडायला लागल्या तर मग बंधन कसे राहणार?

HAREKRISHNAJI said...

It's sang by pandit kumar gandharva and Vaani Jayram

Sandeep Godbole said...

औडीओमेट्री करून पहाणे.

मंगेशकरे गाईले गाणे
इक्डून तिक्डे गेले वारे

असे या नंतर टाळावे.

Devidas Deshpande said...

ज्ञानेश्वर लिहिण्यासाठी आधी j टाईप करायचे. त्यानंतर ~j असे टाईप करायचे. तेव्हा ज्ञ असे अक्षर उमटते.