तुझी ओंजळ चाफ्याची, तुझे सोनसळी हसू,
नको अशा सांजवेळी कुठे रस्त्यात दिसू !
तुझा
हात हातामधे , असे जगणे घडते,
मनातल्या वाटेवर तुझे पाऊल पडते !
दिस संपल्यावरही तुझी
भूल इथे राही,
घरभर दरवळती तुझे चाफा तुझी जुई !
राती रुंजी घालती तुझी छनक पैंजणे,
चंद्र नभापलिकडे तुझे सरेना चांदणे !
डोळे काजळभरले कधी ठेव खांद्यावर ,
तुझ्या
स्पर्शात मिळते माझ्या जन्माचे उत्तर !
No comments:
Post a Comment