अपघात! पेपर मध्ये वारंवार येणार्,या अगदी क्षुल्लकशा अपघाताने जीव गमावावा लागलेल्या कितीतरी घटना. आजही एका कोवळ्या चिमुकल्या कळी ला नाहक जीव गमवावा लागला.
मुलाला क्लास ला सायकलने पाठवायचे म्हटले की पोटात गोळा येतो. तो हट्ट करत राहतो...की सगळेच येतात, मला पण जाऊदे....एकीकडे मूल बावळट, भित्रं होऊ नये, धीट व्हावं हीही इच्छा असते, पण मन धजावत नाही...पौड रोड वरचा वाहता , बेबंद ट्रॅफिक, उखणलेले रस्ते, उंच सखल झालेलं अर्धवट रस्त्याचं काम, भाजीवाले, गर्दी, सिग्नल नसल्याने वनाज़ कडून यॆणारे सुसाट दुचाकी स्वार....एकदा काही वाईट घटना घडली तर मग दोषारोप करण्यात काहीच अर्थ नसतो!
4 comments:
नका पाठवुत. आपले रस्ते व मानसीकता ही सायकलस्वारांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
मी सायकलपटु असुन देखील माझ्या मुलाला जेव्हा नरिमन पॉइंटला पहिल्यांदा त्याला सायकल घेवुन दिल्यानंतर घेवुन गेलो होतो तेव्हा खुप घाबरलो होतो व सायकल बंद करुन ठेवुन दिली.
http://marathi-e-sabha.blogspot.com
आपला सहभाग प्रार्थनीय आहे.
ही दोलायमान मन:स्थिती मीही अनुभवलीये. खूप जीव अस्वस्थ होतो आणि न पाठवावे तर पोर नाराज होते.
अपघात ! फार भयानक अवस्था आहे.आपण नको म्हंटलं तरी मुलं ऐकणार आहेत का? कुठे कुठे आपण पुरे पडणार आहोत? आपण घराबाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येऊ काय? अगदी चालत गेलो तरी.मोठा प्रश्न आहे.मन शांत ठेऊन फक्त पहात राहणेच आपल्या हातात आहे.
http://savadhan.wordpress.com
Post a Comment