Thursday, June 07, 2007

अभिरुची

स्वयंशिस्त, नीट्नेटकेपणा आणि एकूणच 'अभिजातता' ही अनुवंशिक असते असे मला वाटू लागले आहे.
म्हणजे काही लोकांची सामान्यतः बोलण्याची स्टाईल, एकूण व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिक्रिया...सारंच कसं अगदी तोलून, पारखून, 'रिच' असतं........लूज टॉक्स नाहीत, फ़ालतू हसणे नाही, बोजड अपेक्षाही नाहीत.

आणि मला हेही पटलं आहे की आपण कितीही आव आणला तरी मूळ आडातच नाही तर पोहोर्‍यात येणार कुठून?
पण जेव्हा जमेल तेव्हा, अशा उच्च अभिरुचीच्या माणसांच्या सहवासात वेळ घालवून आपले आयुष्य थोडे समृद्ध तर करता येईल!

खरंच! आयुष्य जगण्याच्याही किती तर्‍हा असू शकतात नाही?
असं चाखत चाखत, रुचीने, सवडीने जगता यायला हवं. नव्हे, ते तसं जाणिवपूर्वक जगायला हवं...पण रोजच्या लढाईत आपण ती कोवळीक कधी हरवून बसतो तेही समजत नाही.

आणि दर वेळी सुखा आनंदाच्या, खर्च- खरेदीच्या क्षणी डोकं वर काढणारी ती खास मध्यमवर्गीय अपराधीपणाची जाणिव!
मूल्यं आणि तत्वं यांच्या कोषात लपेटलेली.....


पारंपारिकतेच्या अश्या विळख्यांमधून सुटणं किती अवघड आहे.

4 comments:

A woman from India said...

इतकी उच्चं अभिऋची असलेली कोण बरं व्यक्ति तुला भेटली? की माझीच आठवण झाली तुला? :)

HAREKRISHNAJI said...

how true

Kamini Phadnis Kembhavi said...

खरय ,येउ दे अजीन आम्ही वाचतोय :)

Kamini Phadnis Kembhavi said...

अर्र ते अजून च अजीन झालं ग