प्रिय
ठीक आहेस नं? मी फार अस्वस्थ होते. इतकी बोच मला याआधी कशाचीच लागली नव्हती.
विशेषतः तुला काय काय आरोपांना तोंड द्यावे लागले असेल या विचारानेच मला फार ताण आला होता.
मी तुला समजू शकते. तुझा भावूक, आर्त स्वभाव समजू शकते. तुझ्या या ऋजू वागणूकीचीच तर मला मोहिनी पडते.
पण इतकी तरलता नात्यांमध्ये नाही नं येउ शकत...लेबलं लागली की त्याबरोबर मूल्य ही येतं! निगोशिएशन्स येतात, अपेक्षा येतात!
माझी काही तक्रार नाही. काही प्रॉब्लेम ही नाही. हे कदाचित माझे शेवटचेच पत्र असेल. एकदम नाराज वगैरे नको होऊस. असे थोडे तरंग विरुन जाण्या इतकी आपली आयुष्यं नक्कीच खळबळती आहेत!
मला माहिती नाही, पण इन केस, इफ़ यू ड्रिंक, प्लीज अव्हॉईड.
पुन्हा एकदा, आनंदाच्या निळ्या-पांढर्या झर्यात तुझ्या समरस सहभागाची नाव अलगद दे सोडून......जाईलच ती पुढे.
माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा तर आहेतच.