प्रिय
ठीक आहेस नं? मी फार अस्वस्थ होते. इतकी बोच मला याआधी कशाचीच लागली नव्हती.
विशेषतः तुला काय काय आरोपांना तोंड द्यावे लागले असेल या विचारानेच मला फार ताण आला होता.
मी तुला समजू शकते. तुझा भावूक, आर्त स्वभाव समजू शकते. तुझ्या या ऋजू वागणूकीचीच तर मला मोहिनी पडते.
पण इतकी तरलता नात्यांमध्ये नाही नं येउ शकत...लेबलं लागली की त्याबरोबर मूल्य ही येतं! निगोशिएशन्स येतात, अपेक्षा येतात!
माझी काही तक्रार नाही. काही प्रॉब्लेम ही नाही. हे कदाचित माझे शेवटचेच पत्र असेल. एकदम नाराज वगैरे नको होऊस. असे थोडे तरंग विरुन जाण्या इतकी आपली आयुष्यं नक्कीच खळबळती आहेत!
मला माहिती नाही, पण इन केस, इफ़ यू ड्रिंक, प्लीज अव्हॉईड.
पुन्हा एकदा, आनंदाच्या निळ्या-पांढर्या झर्यात तुझ्या समरस सहभागाची नाव अलगद दे सोडून......जाईलच ती पुढे.
माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा तर आहेतच.
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Friday, May 21, 2010
Tuesday, February 02, 2010
अपघात
अपघात! पेपर मध्ये वारंवार येणार्,या अगदी क्षुल्लकशा अपघाताने जीव गमावावा लागलेल्या कितीतरी घटना. आजही एका कोवळ्या चिमुकल्या कळी ला नाहक जीव गमवावा लागला.
मुलाला क्लास ला सायकलने पाठवायचे म्हटले की पोटात गोळा येतो. तो हट्ट करत राहतो...की सगळेच येतात, मला पण जाऊदे....एकीकडे मूल बावळट, भित्रं होऊ नये, धीट व्हावं हीही इच्छा असते, पण मन धजावत नाही...पौड रोड वरचा वाहता , बेबंद ट्रॅफिक, उखणलेले रस्ते, उंच सखल झालेलं अर्धवट रस्त्याचं काम, भाजीवाले, गर्दी, सिग्नल नसल्याने वनाज़ कडून यॆणारे सुसाट दुचाकी स्वार....एकदा काही वाईट घटना घडली तर मग दोषारोप करण्यात काहीच अर्थ नसतो!

Subscribe to:
Posts (Atom)