नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून?
विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..?
आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते?
प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
खरं तर मला खूप लिहावसं वाटतं ब्लॉग वर........पण घरा-मुलांच्या आणि ऑफ़िस च्या आणि इतर व्यापांमध्ये सगळं राहून जातं रात्री पुस्तक वाचायला मिळतो तोच खरा 'माझा' असा खास वेळ.. उत्साह वाढविणारा, दिलासा दायी